गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांचे मोठे विधान


 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा.शरद पवार साहेब यांनी आज पत्रकार परिषद घेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड केली.

 गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. 

यावर बोलताना पवार म्हणाले की, आरोप केलेल्या काळात गृहमंत्री देशमुख हे हॉस्पिटलमध्ये १५ दिवस क्वारंटाईन होते. देशमुख हे १५  ते २७ फेब्रुवारी या काळात  हॉस्पिटलमध्ये होते. आरोपासाठी परमबीर एक महिना का थांबले?  एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.  आरोपांमध्ये तथ्य नसल्याने राजीनामा नाही. वाझे देशमुख भेटीची माहिती चुकीची आहे. तपास भरकटवण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहेत.

Post a Comment

0 Comments