बार्शीत काँग्रेसने यापुढील सर्व निवडणुका कोणाशीही आघाडी न करता लढवाव्यात - नाना पटोले


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवार दिनांक १७ रोजी सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेतली.त्यावेळी बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे रणनीती आखावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.जीवनदत्त आरगडे यांनी बार्शी मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या लोकसभा उस्मानाबाद मध्ये असून महसुली जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट आहेत असे सांगून बार्शी तालुक्यातील संघटना वाढीबाबत परिस्तिथी कथन केली. 

यावेळी बोलताना ॲड.आरगडे म्हणाले की बार्शी मतदारसंघ हा तीन भागात विभागला गेला आहे त्यामध्ये पहिला बार्शी शहर ज्यामध्ये 'अ' वर्गाच्या नगरपरिषदेचा समावेश आहे आणि एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. दुसरा वैराग भाग ज्यामध्ये लवकरच वैराग नगरपंचायत होत आहे. तिसरी उत्तर बार्शी.एक नगर परिषद एक नगर पंचायत आणि १३७ ग्रामपंचायती.मोठी बाजारपेठ मोठी रेलचेल आणि रस्त्याच्या बाबतीत जंक्शन असणारा मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी नंतर स्वतःच्या ताकतीवर राजकीय लोकांच्या योगदाना शिवाय उभा राहिलेला तालुका म्हणजे बार्शी तालुका असे ते म्हणाले.त्यासाठी वरिष्ठांनी ताकद दिल्यास तो निश्‍चित विजय मिळवु असा आम्हाला विश्वास आहे.

यावर नाना पटोले यांनी अध्यक्षीय भाषणात बार्शी कडे माझे विशेष लक्ष आहे.बार्शीतील लहानसहान घडामोडीला वरती माझे बारीक लक्ष आहे.माझी गुप्त यंत्रणा मला अहवाल देत असते.राज्यातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना मी विशेष करून आपल्या जिल्ह्यात लक्ष द्यायला सांगेन तुम्ही ताकतीने तुमची कामे करा लोकोपयोगी कामात लक्ष घालण्याचे अवाहन पटोले यांनी केले.

यावेळी मंचावर प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे,माजी आमदार बसवराज पाटील,युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे पाटील,खासदार हुसेन दलवाई,माजी महिला प्रदेश अध्यक्षा ॲड चारुलता टोकस,धवलसिंह मोहिते-पाटील,माजी आमदार विश्वनाथ चाकोते,जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments