पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर आणि विरोधकांकडून टीका होत असल्यानं राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संजय राठोड यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राठोड यांचा राजीनामा फ्रेम करण्यासाठी नाही, असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं.
मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाचं नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता राठोड यांच्या राजीनाम्याचं पुढे काय झालं ?. राठोड अजूनही मंत्रीपदी कसे आहेत? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
बीडमधील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप करत भा.ज.पा.नं राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भा.ज.पा.नं दिला होता. पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांकडून कोडीं होण्याची शक्यता असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सपत्नीक भेट घेतली आणि राजीनामा सुपूर्द केला. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर कार्यवाही होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. “राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, राजीनामा घेऊन दोन-तीन दिवस लोटले, तरीही संजय राठोड मंत्रीपदी कायम आहेत. संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही.
0 Comments