बार्शी/प्रतिनिधी:
केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांवर लादलेल्या तीन काळ या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मागील शंभर दिवसापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले होते. याचाच एक भाग म्हणून बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी यांच्या नेतृत्वाखाली बार्शी येथे एक दिवसाचे उपोषण आयोजित करण्यात आले.
बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. जीवन दत्त आरगडे यांनी बार्शी येथे काँग्रेस कार्यालयासमोर या आंदोलनाचे आयोजन करताना चक्क प्रतीकात्मक पेट्रोल पंपाची उभारणी केली. दोन पेट्रोल पंपाच्या यंत्रावर ती भाजपाशासित काळात झालेली पेट्रोल पेट्रोल दरवाढ व काँग्रेसशासित काळामध्ये असलेले पेट्रोलचे दर हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनस्थळी गॅस टाक्या ठेवून त्यावर काँग्रेस काळातील दर व भाजप काळातील वाढलेले दर दर्शवून उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निखील मस्के व युवा नेते तथा नूतन युवक शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केले.
0 Comments