पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले… गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा २१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्यानं एकवेळ बंद राहणार आहेत. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री १० पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. ३ ते ४ महिने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून हा आकडा दररोज वाढत आहे.

दरम्यान, पुणे शहरात गुरुवारी नव्याने १ हजार ५०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात १ हजार ३५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी १ हजार ८६ कोरोनाबाधितग्णां रुची नोंद झाली. यावरुन गेल्या तीन दिवसांत पुण्यात कोरोना किती वेगाने पसरतोय, हे समजायला मदत होते आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात पुन्हा एकदा टेस्टिंगची संख्यादेखील वाढवली आहे. तसंच लसीकरण देखील जोरात सुरु आहे.

Post a Comment

0 Comments