पंढरपूर पोट निवडणूक तिरंगी लढतीचे वारे; हे आहेत इच्छुक उमेदवार


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी पासून ते भाजप पर्यंत उमेदवारीच्या चर्चा रंगू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादी कडून दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कडून महिला चेहरा समोर आल्यामुळे भाजपकडून महिला उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यात पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांचे नाव पुढे आले आहे. दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये तिरंगी लढत होणार का.


दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची  पोटनिवडणूक लागली आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. सध्या भारत नाना भालके यांचे सुपुत्र राष्ट्रवादी आघाडीवर आहे. मात्र राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप कडूनही तोडीस तोड उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.  भगीरथ भालके यांच्या उमेदवारीबाबत शंका निर्माण होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून जयश्री भालके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी जाईल तसेच भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. मात्र भारत नाना भालके यांच्या सुपुत्र भगीरथ भरते यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर निवडून येण्याची दाट शक्यता आहे.

राजकीय हालचालींना वेग आलेला असताना परिचारक गटाची भूमिका अजूनही गुलदस्तातच आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभेसाठी जयश्री भालके यांचे नाव पुढे आले तर भाजपकडूनही महिला उमेदवार देणे शक्यता आहे. भाजपकडून पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा साधना ताई नागेश भोसले यांचे नाव आघाडीवर आले आहे. तर त्याांचे पती नागेश भोसले यांची पंढरपूर राजकारणावर घट पकड आहे. गेल्या सात वर्षांपासून पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून काम करत आहेत. तसेच असा सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. परंतु, पांडुरंग परिवाराकडून अजून नेमकी भूमिका जाहीर केलेली नाही. 

रासप व स्वाभिमानीची महाविकास किंवा भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणीपंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सभासद वाढवा अभियान सुरू करण्यात आले होते. तसेच पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये स्वाभिमानीकडून मतदारसंघावर हक्क सांगण्यात आल आहे. तर महा विकासाकडे या मतदारसंघाची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात येणार आहे. तसेच रासपचे महादेव जानकर यांनी आपला उमेदवार मैदानात उतरवण्याची घोषणा केली आहे तर धनगर समाजाकडून होळकर वाडा येथे धनगर समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये धनगर समाजाला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे धनगर समाजाकडून राष्ट्रवादी व भाजप यांचेकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी केली होती. तसेच २१ मार्चला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे पंढरपूर दौऱ्यावर येत असून त्यावेळी वंचित आघाडीचा उमेदवार घोषित होण्याची दाट शक्यता आहे.

दामाजी चेअरमन समाधान आवताडे यांच्या नावाची जोरदार दोन्ही पक्षातून होत आहे. मात्र महिला उमेदवार दिल उमेदवारीनंतर समाधान आवताडे अपक्ष उमेदवारी भरण्याची दाट शक्यता आहे. २०१९ साली मंगळवेढा तालुक्यातील भरघोस अशी मते मिळाली होती. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये तिरंगी लढतीचे वारे वाहत आहे.

Post a Comment

0 Comments