पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ महाराष्ट्रावर येईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपन्न झाले आहे. १० दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांच्या बाबत भाष्य केले आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशन घेणे कोरोना काळात जोखिमचं होतं. यात सर्व पक्षीय नेत्यांच्या उत्तम सहकार्याने अधिवेशन पार पडले. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असणाऱ्या केंद्र सरकारने तशी किमान कृती करावी. पीक विम्याचा फायदा मूळ शेतकऱ्याला होत नसतांना त्यात बदल होणे गरजेचे आहे, त्यावर केंद्र सरकारने निर्णय घ्यावा. तपास होण्यापूर्वी एखाद्याचे चारित्र्य मलिन करणे चुकीचे आहे, सचिन वझे यांच्या प्रकरणात कुठल्या ही परिस्थितीत दोषींना शिक्षा होईल. कुठल्या ही प्रकरणात चौकशी करण्यापूर्वीचं कुणाला ही निलंबित करणे चुकीचे आहे. सचिन वझे हे काही लादेन नाहीत. कोरोना टाळण्यासाठी जनतेने काळजी घ्यावी; अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल.

 अजित पवार यांनी यावेळी वीज बिलाच्या प्रश्नाबाबत भाष्य केले असून, ५४ हजार कोटी थकबाकी पैकी ३० हजार कोटींची माफी दिली आहे. ऊर्जा मंत्री उपस्थित नसल्याने अधिवेशन संपेपर्यंत वीज बिल वसुलीला स्थगित देण्यात आली होती. महावितरण कंपनी बुडीत जाणार नाही याची ही काळजी घ्यावी. पीक विम्या बाबत जुनेच नियम ठेवून शेतकऱ्यांना न्यान द्यावा यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा.

Post a Comment

0 Comments