उजनी जलाशयाचा उडान - रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम ‘ मध्ये समावेश करण्याची केंद्र सरकारकडे मागणी - खासदार सुप्रिया सुळे


सोलापूर जिल्हा व पाश्चिम महाराष्ट्रचे जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या उजनी जलाशयाचा समावेश ' उडान - रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम ' मध्ये करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे .

सोलापूर जिल्हा व पाश्चिम महाराष्ट्रचे जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या उजनी जलाशयाचा समावेश ‘ उडान – रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम ‘ मध्ये करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन खा. सुळे यांनी लेखी निवेदन दिले आहे.

उजनीच्या पाण्यावर विमाने उतरण्यासाठी आवश्यक असणारे वातावरणदेखील येथे उपलब्ध असल्याचे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे . महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी पंढरपूर , कोल्हापूर , तुळजापूर ही धार्मिक स्थळेही जवळच आहेत . जवळ असलेल्या नाशिक , औरंगाबाद , कोल्हापूर आणि मुंबई या विमानतळांना जोडणारे ठिकाण म्हणून हा जलसाठा विकसित होऊ शकेल . गोवा , ठाणे क्रिक , साबरमती वॉटर – फ्रंट आणि सरदार सरोवरातील प्रस्तावित व सध्या अस्तित्वात असणाऱ्या जल – हवाई केंद्रांना जोडणारे हे ठिकाण ठरेल , असेही खासदार सुळे यांनी म्हटले आहे .

त्यांच्या या मागणीला कितपत यश येते याकडे संपूर्ण पाश्चिम महाराष्ट्रचे लक्ष्य राहणार आहे

Post a Comment

0 Comments