राज्यपाल देहरादूनला रवाना ; महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट रद्दराज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देहरादूनला रवाना झाले आहेत . आज महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राज्यपालांची भेट घेणार होते. राज्यपाल कोश्यारी २८ मार्चपर्यंत देहरादूनमध्ये असतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार, अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. काल (बुधवारी) भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. 

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , सुधीर मुनगंटीवार , प्रवीण दरेकर , आशिष शेलार आदी भाजपच्या नेत्यांनी कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना निवेदन सादर केलं. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा , अशी मागणी केली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे . दरम्यान , महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट आता टळली आहे . यावरून पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार असं चित्र पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments