एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझेंना अटक करा: देवेंद्र फडणवीस



मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे अधिकाऱ्यावर २०१ च्या अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. फडणवीसांच्या या मागणीवर मात्र, वाझेंनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक हिरेन मनसुखानी याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील रेती बंदर खाडीजवळ हा मृतदेह आढळून आला. 

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पियो गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वझे हे अधिकारी तपास करत आहेत. वझे यांनी हिरेन मनसुख यांना जबानी घेण्यासाठी सोबत घेतले होते व त्यानंतर काही दिवसातच रेतीबंदर जवळ हिरेन मनसुख यांचा मृतदेह आढळून आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे या अधिकाऱ्यावर २०१ च्या अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. 


Post a Comment

0 Comments