सांगली जिल्ह्यातील विटा पोलिस ठाण्याचे एपीआय प्रदिप झालटे यांच्यासह दोन कॉन्स्टेबल एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. सदर लाचखोर पोलिसांना पकडताना लाचलुचपत विभागाच्या कर्मचा-यांशी कॉन्सेटबल विवेक यादव आणि अकीब तांबोळी या पोलिसांनी झटापट केली तर एपीआय झालटे हे फरार आहेत.
तक्रारदार यांच्या मालकाच्या विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी ए पी आय प्रदिप झालटे आणि कॉन्सेटबल विवेक यादव, अकीब तांबोळी यांनी दिड लाखाची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी सांगली येथील लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने सापळा लावून कॉन्सेटबल विवेक यादव, अकीब तांबोळी यांना एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक केली तर एपीआय झालटे हे फरार आहेत. एपीआय प्रदिप झालटे, कॉन्सेटबल विवेक यादव आणि अकीब तांबळी यांच्या विरोधात विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे अधिकारी सुजय घाटगे यांनी दिली.
0 Comments