इंधन दरवाढीचा विरोध करत महिलांनी प्रधानमंत्र्यांना पाठवल्या शेणाच्या गोवऱ्या


गेल्या काही दिवसात इंधन दर वाढ सातत्याने होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. या इंधन दरवाढीचा निषेध करत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत.

गॅस दरांमध्ये दिवसागणिक होत असलेल्या वाढीचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने यांच्या सूचनेनुसार घनसावंगी तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेणाच्या गोवऱ्या भेट म्हणून पोस्टाने पाठवण्यात आल्या. या वेळी तालुकाध्यक्षा वंदना पवार, कमल चिमणे, कौशल्या चिमणे, सरस्वती डोरले, रुक्मिणी चिमणे, अयोध्या चिमणे, रुक्मिणी नारायण चिमणे आदी महिलांची उपस्थिती होती.


   

Post a Comment

0 Comments