मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ मार्च ला होणारमराठा आरक्षणाबाबत आजची सुनावणी संपली आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना नोटीस देण्यात आली आहे. आरक्षण संदर्भात म्हणणे मांडण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण अनेक राज्यात गेले आहे. त्यावर कोर्टानं राज्यांना भूमिका मांडायला सांगितली आहे. 


फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेलं असून त्या राज्यांचा देखील यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून या प्रकरणात आता ज्या राज्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा राज्यांना देखील नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.

पुढील सुनावणी १५ मार्चपासून १० दिवस सुरू होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी झाली. 

Post a Comment

0 Comments