टायगर श्रॉफच्या फॅमिलीसोबत दिसली दिशा पटानी, अफेयरच्या चर्चेला आले उधाण


टायगर श्रॉफच्या प्री बर्थडे सेलिब्रेशनमध्ये दिशा पटानी टायगरच्या फॅमिली सोबत डिनरला गेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या अफेयर्सच्या चर्चा रंगल्या आहेत. टायगर आणि दिशा लवकरच त्यांच्या नात्याला नाव देतील, अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे.

टायगर त्याची आई आयषा श्रॉफ आणि बहिण कृष्णा श्रॉफसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसले. विशेष बाब म्हणजे, यावेळी टायगरच्या फॅमिलीसोबत दिशा पटानीदेखील उपस्थित होती. यावेळी दिशाने शिमरी टँक टॉप घातला होता. हाय हिल्समध्ये ती खूप स्टनिंग दिसत होती. 
(Advertise)

टायगरची बहिण कृष्णा श्रॉफने ब्लॅक टॉपसोबत शायनी स्कर्ट परिधान केला होता. संपूर्ण फॅमिली आणि लेडी लव दिशाने मिळीम टायगरचा बर्थडे स्पेशल बनवण्यासाठी सुरूवात केली. या प्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी त्यांनी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर केला. टायगरच्या फॅमिलीसोबत दिशाला पाहून ती लवकरच दिशा आणि टायगर लग्न करू शकतात, असे तर्क लावले जात आहेत. 

Post a Comment

0 Comments