माजलगाव : तालुक्यातील पात्रुड येथे अनेक दिवसापासून जागेच्या किराया वरून दोन भावांमध्ये वाद होत होता. त्या वादाचे रूपांतर दि. ०८ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. मोठ्या भांडणात होऊन लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
माजलगावपासून सात किलोमीटर अंतर असलेल्या पात्रुड येथे प्लॉटमध्ये असलेल्या किरायाचा वादावरून दोन भावामध्ये अनेक दिवसापासून भांडण होत होते. दि. ०८ मार्च रोजी सायंकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास दोघा भावात घरी जोरदार भांडण झाले. यावेळी दोघा भावांच्या हातात धारदार शस्त्र असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भांडणात शेख हर्षद शेख शकील या छोट्या भावाने शेख इर्शाद शेख शकील याचा धारदार गुप्ती पोटात खुपसुन खून केल्याची घटना घडली. त्यानंतर आरोपी स्वत: माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. या भांडणात आई एका जणाच्या बाजूने तर वडील एकाच्या बाजूने असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनास्थळी ग्रामीण पोलीस तत्काळ हजर झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील यांनीही पात्रुड येथे भेट दिली. या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments