पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून या उमेदवाराचे नाव निश्चित


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी कडून दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समाधान महादेव अवताडे यांची उमेदवारी देण्यात आली.  आमदार प्रशांत परिचारक यांनी अवताडे यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे याबाबत अधिकृत घोषणा भारतीय जनता पार्टी कडून करण्यात येणार आहे.

भाजप उमेदवारी मिळालेले समाधान आवताडे यांचा अल्पसा परिचय...

समाधान आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक व चेअरमन आहेत तसेच हे उद्योजक म्हणून पण ओळखले जातात. समाधान आवताडे यांनी २०१४ साली शिवसेना शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावर
पंढरपूर मंगळवेढा निवडणूक लढवली होती. २०१९ साली अवताडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांचा निसटता पराभव झाला होता. २०१९ साली निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातून एक नंबरची मते मिळाली होती. ग्रामीण भागामध्ये अवताडे गटाची प्राबल्य आहे. पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या आधीच प्रचाराला सुरुवात केली होती. भाजप कडून समाधान आवताडे यांची तिकीट जवळपास निश्चित झाले आहे.


राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून सस्पेन्स कायम...

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पंढरपूर मंगळवेढा हा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र भाजपकडून समाधान आवताडे तुमचे नाव जवळपास जाहीर झालेले आहे. मात्र महा विकास आघाडीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. विकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस साठी हा मतदार संघ सोडण्यात आला आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार ठरवण्यात आला आहे मात्र घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना व काँग्रेस उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार सस्पेन्स कायम असल्याचे दिसून आले.

भाजपकडून समाधान अवताडे हे ३० मार्च रोजी भरणार फॉर्म...
भारतीय जनता पार्टी कडून पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी समाधान आवताडे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी समाधान आवताडे हे शक्ती प्रदर्शन करत भाजप कडून फॉर्म भरणार आहे. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उमेदवारीचा फॉर्म भरताना भाजपचे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यामुळे ही लढत दुरंगी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments