स्वस्त झालं सोनं ; सोनखरेदी दारांना चांगली संधी


भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यातच सोन्याचे भावही  कमी होत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडे सध्या सोनेखरदेची एक चांगली संधी आहे. सोन्याचे दर प्रति तोळा  ४४,४०० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी  झाले आहेत. 

शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे भाव ०.३ % नी कमी होत ४४,४०० रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदे किंमत  ०.६ % नी घसरून ६५,५२३ रुपये प्रति किलो झाली आहे.

याआधीच्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती कमी होऊन गेल्या काही महिन्यातील निच्चांकी स्तरावर पोहोचल्या होत्या. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर ४४,५८९ प्रति तोळावर पोहोचले होते.आतापर्यंत १२,००० रुपयांनी स्वस्त झालं सोनं झालं.

Post a Comment

0 Comments