…आणि घेतली उज्ज्वल भविष्याकडे झेपभविष्यासाठी कायम तत्पर

मी कांचन महादेव घरत. चंद्रपूर शहर माझं गाव. मी नाशिकमध्ये नोकरीसाठी आले तेव्हा सुरूवातीला खूप अडचणी आल्या. इथे आल्यावर काही दिवस जॉबसाठी अडचणी आल्या. पण नंतर कौशल्य विकास विभागाच्या योजनेबद्दल समजलं आणि कौशल्य विकास रोजगार योजनेसाठी नोंदणी केली. त्यानंतर मला डाटामॅट्रिक्स कंपनी मध्ये “HR-Trainee” या पदावर काम करण्याची संधी मिळाली. पहिले सहा महिने कौशल्य विकास रोजगार या योजनेअंतर्गत “Trainee” म्हणून जॉईन झाले. त्यानंतर माझं काम बघून मला पुढं काम सुरु ठेवण्याची संधी मिळाली.

 कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या माध्यमातून मी नोंदणी केल्याने मुलाखतीद्वारे माझी निवड झाली. अशा संधीचा फायदा अनेक युवकांनी युवतींनी घ्यायला हवा. ही संधी माझ्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली. माझ्या शिक्षणाशी सुसंगत असे काम मिळाल्याने मला माझ्या कुटुंबाला आनंद झाला. हातात पैसे मिळाल्यानं आता कुटुंबालाही उदरनिर्वाह चालविण्यास मदत होत आहे.

 आता मी याच कंपनीमध्ये काम करत आहे आणि आज माझे भविष्य उज्ज्वल आहे.  कौशल्य विकास विभाग व डाटामॅट्रिक्स ग्लोबल सर्विसेस यांचे मी आभार मानते. ज्यांनी मला आत्मनिर्भर होण्याची संधी दिली.

कांचन महादेव घरत, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments