अंबानी स्फोटकं प्रकरण; ती संशयास्पद इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच



मुकेश अंबानी प्रकरणाला रविवारी वेगळेच वळण मिळालं. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनाच या प्रकरणात अटक केली. 

जिलेटीनच्या स्फोटकं कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यानंतर आता स्कॉर्पिओ कारबरोबर दिसलेली इनोव्हा कारही सापडली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार मुंबई पोलिसांचीच असल्याचं समोर आलं आहे.

 उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी (२५ फेब्रवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता.

 ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून (ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होतं.

दरम्यान ही इनोव्हा कार सापडली असून, शनिवारी रात्री एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली.

Post a Comment

0 Comments