बार्शी तालुक्यातील खामगाव येथे किरकोळ कारणावरून तलवार हल्ला


बार्शी/प्रतिनिधी:

खडी क्रेशर वर जाऊन शिविगाळ करत एकास तलवारीने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार खामगाव ता.बार्शी शिवारातील एका खडी क्रेशर वर घडला. राहुल रामराव पाटील ,मुकुंद दत्तादास पेजगुडे व गोपाळ बाळासाहेब जाधव सर्व रा खामगाव ता बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

जखमी राहुल विश्वंभर काटे वय ४० वर्षे, रा खामगाव ता बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की खामगाव शिवारातील शेतातील शेती गट नंबर ४१० मध्ये असलेल्या मिहुल कंन्सस्ट्रशन खडी क्रेशर व डांबर प्लँट मध्ये कामकरीता असलेला त्यांचा चुलत भाऊ विनोद उर्फ काका रामेश्वर काटे याचे हायवा टिप्पर बंद पडल्याने तो चालु होतो का बगा असा विनोद उर्फ काका याचा फोन आला होता. म्हणुन ते मिहुल कंन्सस्ट्रशन खडी क्रेशर व डांबर प्लँट येथे गेले होते.

त्यावेळी ते विनोद मारुती काटे यास बंद पडलेल्या टिप्पर बाबत चौकशी करत असताना सदर ठिकाणी एक फोर व्हीलर गाडी टाटा कंपनीची पांढ-या रंगाची कार नंबर MH-12/GZ-4366 ही गाडी त्यांच्या जवळ येऊन गेट जवळ थांबली व त्यातुन गावातील इसम तिघे जवळ आले व त्यांनी भाऊ विनोद यांचे नावाने तेथे येऊन शिवीगाळी करु लागले त्यावेळी फिर्यादी त्यांना म्हणाले की तुम्ही माझे चुलत भावाला विनाकारण शिवीगाळी का करता त्यांने तुमचे काय केले आहे.

ते असे म्हणत असताना राहुल पाटील हा रागाने त्यांच्या
कडे बगुन शिवीगाळी करत त्याने त्याचे गाडीचा दरवाजा उघडुन गाडीतील तलवार बाहेर काढुन फिर्यादीच्या कमरेच्या डावे बाजुस पोटावर वार केला. त्यावेळी जवळच उभा असलेला मुकुंद पेजगुडे व गोपाळ जाधव या दोघांनी त्यांना धरुन हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.

त्या वेळी ओरडण्याचा आवाज ऐकुन विराज रामदास तोडकर, विनोद मारुती काटे व तेथ जमलेले लोकांनी भांडण सोडव केली त्यावेळी राहुल पाटील, मुकुंद दत्तादास पेजगुडे ,गोपाळ जाधव हे तेथुन जाताना म्हणाले की तु आता वाचला परत तुला व काका काटेला बगुन घेतो असे म्हणुन धमकी देऊन ते तेथुन निघुन गेले.
याबाबत पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments