“सचिन वाझे ‘वर्षा’वर जाऊन कसे राहायचे ?” नितेश राणेंचा गंभीर आरोप !


सचिन वाझे प्रकरणात एन.आय.ए. चौकशी करत असताना भा.ज.पा.कडून आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. “सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच रिपोर्टिंग व्हायचं. परमबीर सिंग यांना ते विचारतच नव्हते”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. 

 “… म्हणून सचिन वाझेंना वाचवायचे प्रयत्न झाले” नितेश राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. “सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते.
 म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते”
असं राणे म्हणाले आहेत. “सचिन वाझे वर्षावर कुणाच्या परवानगीने राहायचे ?” सचिन वाझे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायचे, असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केला आहे.

 “सचिन वाझे वर्षावर का राहायचे? वर्षा कुणाचं निवासस्थान आहे? वर्षावर राहायची परवानगी त्यांना कुणी दिली होती? त्यामुळेच सचिन वाझे हा थेट उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

Post a Comment

0 Comments