स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी गोपीचंद पडळकर आक्रमक



राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रस्त्यावर झोपून आयोगाच्या निर्णयाला विरोध केला आहे. 

पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान एक लाख मूल अभ्यासासाठी पुण्यात येतायत. ही मुलं गरीब शेतकऱ्यांची बाराबलुतेदारांची असतात. दर महिना यांना ८ ते ९ हजार खर्च येतो. असे असताना देखील आयोगाने ५ वेळा एमपीएससीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच, या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडलकरांनी केला.

ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.


 

Post a Comment

0 Comments