कोल्हापूर/प्रतिनिधी :
कोल्हापूर उच्चतम गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड यामध्ये गोकुळ”नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या कामाची दखल घेऊन आयएसओ २२०००:२०१८’मानांकन मिळाले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळवणारा गोकुळ’ राज्यातील पहिला दूध संघ आहे.
यापूर्वी गोकुळकडे शाखा व मुख्य दुग्धशाळेकडे सुरवातीस ‘आएसओ ९००२, आयएसओ ९००१ : २००८’ (अन्न व सुरक्षा कार्यप्रणाली) व त्यानंतर ‘आयएसओ २२००० :२००५’ या कार्यप्रणालीनुसार कामकाज होत होते. याचीच पुढील सुधारित कार्यप्रणाली म्हणून ‘आयएसओ २२०००: २०१८’ मानांकन प्राप्त करणेचा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून संघामार्फत सुरू होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्टिफिकेशनचे काम करणारी जर्मनमधील एजन्सी टी.यू.व्ही. नॉर्ड यांचे वरिष्ठ पातळीवरचे अधिकाऱ्यांनी १ मार्च २०२१ ते दि. ६ मार्च, २०२१ या काळांत मुख्य दुग्धशाळेबरोबर विविध शाखांना भेटी देऊन गोकुळच्या कामकाजाची तपासणी केली. सदरच्या तपासणीमध्ये विशेषतः उत्पादित होणारे गुणवत्तायुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीनुसार होणारे कामकाज, प्लँट स्वच्छता, दूध व दुग्धजन्य पदार्थ पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे पॅकिंग मटेरियल व पॅकिंगवेळी निघणारे वाया गेलेल्या पॅकिंग मटेरियलची केली जाणारी निर्गत आदी बाबींचा विचार करून ‘आयएसओ २२०००:२०१८ मानांकन देण्याचे जाहीर केले.
कोरोना काळात देखील संघाने उत्तम नियोजन व कर्मचाऱ्यांच्या बळावर चांगले काम केले. त्यामुळे संघाला आपला दबदबा कायम राखला आहे. तसेच नेहमी गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे
दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे परतावा देणे शक्य
कोरोनाच्या काळातही संघाचे अधिकारी व कर्मचायांनी सदरचे मानांकन प्राप्त करण्यासाठी सहकार्य केलेच. त्याचबरोबर उच्च दर्जाचे दूध पुरवठा करून शेतकयांनी मोलाची साथ दिली. त्यामुळेच हे यश मिळाले, गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांना मुंबई, पुणे ,गोवा सारख्या उच्चभ्रू ग्राहकांडून चांगल्या प्रकारे मागणी होणार असलेणे, जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे परतावा देणे शक्य होणार आहे – रवींद्र आपटे (अध्यक्ष, गोकुळ)
0 Comments