वेळापूर! पोलिसांनीच मोडला कायदा : पोलिसाचा बर्थडे धूम धडाक्यात, सहाय्यक पोलिसासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल


अकलूज/प्रतिनिधी:


कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही पोलिसांनीच धुमधडाक्यात वाढदिवसाचा जल्लोष साजरा करणाऱ्या  सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पोलिसांना एक कायदा सर्वसामान्य नागरिकांना वेगळा कायदा आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

साहाय्यक पोलीस निरीक्षकासह २५ जणांवर गुन्हे दाखल
वेळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे महेश पोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, बर्थडे बॉय विनोद साठे, गौरीहर गुरव, विशाल उर्फ मल्हारी नाईकनवरे, अंकुश साठे, वैभव बनसोडे, असलम आतार, महेश नाईकनवरे, राहुल नाईकनवरे यांच्यासह उपस्थित असणारे वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले.
(Advertise)

समाज माध्यमातून व्हिडिओ व्हायरल

वेळापूर येथील पालखी चौकामध्ये वेळापूर पोलीस चौकीमध्ये करीत असणारे विनोद साठे यांच्या वाढदिवस असलेल्या एपीआय दिपक जाधव  आणि २५ जणांवर डीजे लावून तालावर नाचत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून वायरल झाला. त्यानंतर वेळापूर पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे वाढदिवस असलेल्या विनोद साठे या पोलिसासह सहभागी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव  आणि २५ जणांवर गुन्हा दाखल केेल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांची माहिती दिली. सदर पोलिसांसह पंचवीस जणांवर मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंग पालन न करणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवण तसेच १४३,१८८,२६९ कलमाखाली कारवाई करण्यात आली.

Post a Comment

0 Comments