शेती पंपाची विज कनेक्शन तोडु नये व कोरोना काळातील संपुर्ण विजबील माफ करावे-जेऊर, संभाजी ब्रिगेडची मागणी


जेऊर/प्रतिनिधी:
              
२०२० व २०२१ या काळात कोविड १९ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. उत्पन्न नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या कठीण काळात महावितरणकडून सक्तीची विजतोडणी चालू आहे, ती थांबवण्यात यावी. व विजबील वसुली त्वरीत स्थगित करण्यात यावी. तसेच कोरोना काळातील विजबील माफ करण्यात यावे, सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा. 

हि आमची मागणी आहे. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण शासन स्तरावर पाठपुरावा करावा. हि आमदार संजयमामा शिंदे यांना संभाजी ब्रिगेड करमाळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे भाऊसाहेब साबळे, राकेश पाटील, पांडुरंग घाडगे, हेमा शिंदे, पिंटू जाधव, अत्तुल निर्मळ, शुभम कोठावळे, सुहास शिंदे, रनजीत कांबळे, लतेश घनवट, आकाश लोंढे, लालासाहेब लोंढे, समाधान लोंढे, प्रशांत लोंढे, ग्रां. पं. सदस्य श्रीहरी आरने, कैलास साबळे, शिवहारी गोंडगिरे,  तात्यासाहेब सपकाळ, बाबु शिंदे, दिनेश घाडगे, रेवननाथ निर्मळ, विष्णू शिरस्कर, वैभव मोहिते, दादा मोहिते, संतोष निर्मळ, शुभम कर्चे आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments