अन् 'म्हादा' आता फौजदार झाला...


शिवाजी विद्यापीठात एम.ए साठी आलो.साल होतं २०१५. घर,गाव,तालीम सोडून होस्टेल नावाच्या वर्तुळात शिरलो.अस्वस्थ काळाच्या परिघात गुंतलो होतो.सगळच जगणं नवीन.त्यात हे होस्टेल नावाचं प्रकरण खुप अवघड.पण रुम मेट म्हणुन म्हादा सोबतीला आला अन् त्याच्या बोलक्या,चंचल,हसऱ्या,उद्योगी स्वभावाची मला सोबत घडली.

महादेव पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगावचा.म्हादा गरीबा घरचा.आई बाप दोघांनी कोल्हापुरी चपलांची कारागिरी करुन संसार उभा केलेला.विद्यापीठात म्हादाने अर्थशास्त्र विभागात प्रवेश घेतलेला तर मी राज्यशास्त्र.तो बी.ए.पासूनच स्पर्धा परीक्षेच्या नादी होता.विद्यापीठात ही त्याचा अभ्यास करुन फौजदार व्हायचं हाच अट्टाहास होतो.म्हादाचं वडील कधी मधी रुम वर यायचं.खुप कमी बोलायचे.अभ्यास करा असं सांगायचे अन् निघून जायचे.हा मात्र खुप बडबड्या. शिवाजी पेठतंल,खंडोबा तालीम मंडळाचं वारं म्हादाच्या अंगात नेहमी संचारलेलं असायचं.
त्याच्याकडे स्प्लेंडर गाडी होती. खुप पळवायचा गाडी ; अगदी वाऱ्यासारखा.त्यांची कपड्यांची स्टाईल,केसांची,अगदी चपलांची, वेगळच काय तर असायचं.मला काय त्याचं हे राहणं पटायचं नाय.कधी तर माझ्या बँगेतून एखादा खादीचा माझा ड्रेस ही तो चढवायचा.मग मी म्हणायचो.'महादेवराव बघा बरं कसं दिसतंय आता'.... 

नविन काय घेवुन आला की मला ते दाखवण्याची त्याची धडपड असायची.'भाई... कसं दिसतंय हे..? क्वालिटी हाय नव्हं...?' मी म्हणायचो.... 'एकच नंबर'... तसा तो आनंदी व्हायचा... ती नवी कोरी वस्तु अंगावर चढवून गाडीला किक मारायचा.... विद्यापीठ परिसर,सायबर चौक,एनसीसी भवन, कधी पेठेतून ही मिरवून यायचा.... मी मात्र होस्टेल सोडत नसायचो...
एक पैलवान माझा रुममेट आहे याचं त्याला कौतुक होतं.प्रत्येक मित्राला हे तो सांगायचा.तो सर्वांच्या मदतीला यायचा.म्हादाच्या गजबजी स्वभामुळे रुमध्ये रमायचं ही.आनंदी,बिदांस्त जगण्याचे तो सर्व पर्याय वापरायचा.पण त्याने अभ्यास कामय ठेवला... लवकर उठून तो अभ्यासिकेत जाण्याचं,व्यायामाचं सत्र मात्र  पाळत होता.त्याचं फळ त्याला मिळालं.आई बापानं न पाहिलेलं स्वप्न ही त्यांने पुर्ण केलं.आज बरोबर वर्ष भरापुर्वी तो पी.एस.आय ची परीक्षा पास झाला.लॉकडाऊन मध्ये त्याने दोनाचे चार हात ही करुन घेतले.म्हादा फौजदार झाला याचा आनंद आहे.तो कायम मित्र नव्हे तर भावासारखा भासत राहीला.त्याने ही माझ्या बाबतीतला तो मान कायम ठेवला.वर्ष भर त्यांचे सत्कार कौतुक सुरु होते पण मात्र त्याच्या पर्यंत पोहचलो नव्हतो.

म्हादाला वाटलं ही असेल 'भाई विसरले आपल्याला... पण 'असं मी विसणारा नाही महादेव...!'

महादेवच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला.खुप वेळ गप्पा गोष्टी केल्या.त्यात ही त्याने टोमणा मारलाच 'भाई तुम्ही मोठ्ठी माणसं' मी म्हणलं महादेवराव तुम्ही साहेब झालायसा आत्ता आमचं कशाचं काय...'

मी पैलवानकीच्या चौकटीला माणूस.कुस्ती जगून विद्यापीठात आलो तरी पैलवानकीच्या आचारसंहितेचं पालन करत जगणं माझ्या अंगवळणी होतं.त्या पद्धतीनं माझा वावर असायचा.म्हादा मात्र बिंधास्त मस्त मौला माणूस.आनंद मिळवण्याच्या त्याच्याकडे कोणत्याच चौकटी,वर्तुळे नव्हती.गणेश उत्सवावेळी पेठत जाऊन तो मनसोक्त नाचून यायचा.विद्यापीठात लेक्चरला कधी नाही पण विभागात कार्यक्रमाला मात्र एन्जॉय करायला नक्की जायचा.नेहमी गड्याचा काय ना काय धरधराट असायचा.

म्हादाचे उनाड डाव मला पटायचे नाहीत.मी अनेकदा रुम मध्ये महादेवला रागात बोलायचो,ओरडायचो.वाटेत कुठे भेटला तर म्हणायचो 'फिरुन झालं असेल तर या रुम वर...' 
म्हादाने माझं बोलनं कधी वाईट माणून घेतलं नाही.कधी ओरडलो तर 'भाई...' इतकच म्हणत थोडासा इरमायचा,किचींत हसायचा. पण तोंड वरुन करुन म्हादाने मला कधी पलटून उत्तर दिलं नाही.तितका नम्रपणा त्याच्याकडे होता.आज तो फौजदार झाला.महादेवचा सत्कार करताना मी चेष्टेत म्हणालो... 'साहेब काय चुकल असेल तर माफ करा आम्हासनी....' तो जरा खजील झाला.

आस्लम काझीचा भाचा  माझा रुममेट आहे.असं तो गावभर सांगायचा.त्याचं त्याला अप्रुक होतं.मामा बद्दल, गावाकडे आई-वडीलांबद्दल, जुनेद बद्दल तो कायम चौकशी करायचा. आज ही करतो.माझ्याशी त्याचं असणारं मित्रत्व,बंधुत्व पुढे ही कायम राहील.

महादेवच्या जगण्याला चौकटी नसल्या तरी तो कायम कष्टाळू अन् प्रयत्न पुर्वक राहिला यामुळेच त्याच्या वाट्याला हे यश आलं.अशा असंख्य आठवणी आहे पण आता थांबतो.बाकी महादेवने पोलिस खात्यात चांगली कामगिरी करावी अन् मोठ्ठ व्हावं.

 महादेव.... पुढील यशस्वी कारकिर्दसाठी आपली १०४ नंबर रुम भरुन शुभेच्छा...

     ✍🏻 पै.मतीन शेख ( फेसबुक वरून साभार)

Post a Comment

3 Comments

  1. Khup chan lekh...congratulations Mahadev 🎉🎊

    ReplyDelete
  2. अभिनंदन महादेव.

    ReplyDelete
  3. 'महा'देवरावांची 'महा'राष्ट्र पोलिस मध्ये 'महा'न कारकीर्द घडो या शुभकामना....🌷🌷🌷🌷

    ReplyDelete