सुप्रिया सुळे व सदानंद यांच्या लग्नात 'बाळासाहेब ठाकरे' यांची महत्त्वापूर्ण भूमिका


महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि ठाकरे हे नाव नेहमीच चर्चेत असते. पवार आणि ठाकरे घराण्याचे मैत्रीपूर्ण आणि कौटुंबिक संबंध देखील जुने आहेत. अगदी मग ते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची जुनी मैत्री असू किंवा मग आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे महाराष्ट्रातील सरकार असो. हे २ नाव नेहमीच महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात चर्चेत असतात.

स्व.बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अगदी त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर नात्यात देखील झालेलं आहे. या नात्याविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. वडिलांचे नाव न वापरता त्या सुळे हे आडनाव घेऊन राजकारणात वावरतात.

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ ला पूण्यात झाला. शरद पवार यांनी ज्यावेळी प्रतिभा यांच्याशी लग्न केलं होतं त्यावेळी त्यांनी एक अट घातली होती. ती अट होती लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याची. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. या धाडशी निर्णयामुळे सुप्रिया सुळे एकुलत्या एक. त्याकाळी असा मोठा निर्णय म्हणजे विचाराची आधुनिकता दिसून येते.

मुलगी सुप्रियाला देखील शरद पवारांनी स्वातंत्र्य दिले. त्यांचे निर्णय त्याच घेत असत. सुप्रिया सुळे यांचं कॉलेज झाल्यानंतर त्या पुण्यात एका अग्रगण्य वृत्तपत्रात नोकरी करू लागल्या. त्यावेळी त्या आपल्या काकांकडे राहायला होत्या. १ वर्ष त्या काकांकडे राहिल्या. पुढील वर्षी एका फॅमिली फ्रेंडकडे त्या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची भेट एका तरुणाशी झाली.

तो तरुण म्हणजे सदानंद सुळे. सदानंद सुळे हे बाळासाहेबांचे सक्खे भाचे होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुत्र सदानंद आहेत. त्याच भेटीत त्यांची ओळख झाली. त्यांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी ६ महिने वेळ दिला. दोघे एकमेकांना आवडायला लागले. दोघांचे लग्न हे बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पुढाकाराने झाले.

बाळासाहेबांनी जेव्हा सुप्रिया यांच्या लग्नाबद्दल शरद पवार आणि प्रतिभा ताईंना विचारले तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला होता. शरद पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री होते. ४ मार्च १९९१ रोजी त्यांचे लग्न सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी झाले.

सुप्रिया आणि सदानंद यांना विजय आणि रेवती हे दोन मुलं आहेत. सदानंद हे त्यावेळी अमेरिकेत राहत होते. लग्नानंतर सुप्रिया यांनीहि काही काळ कॅलिफोर्निया मध्ये घालवला होता. तिथे बर्कले युनिवर्सिटीत प्रवेश त्यांनी घेतला होता. नंतर सदानंद यांच्या बदलीमुळे इंडोनेशिया आणि सिंगापुर मध्ये देखील त्यांनी काही काळ घालवला. त्यानंतर मुंबईला परतल्या.

Post a Comment

0 Comments