सोलापूर ! बचत गटाचा हप्ता मुळे टॉवेल कामगाराची आत्महत्या


सोलापूर/प्रतिनिधी:

बचत गटाचे हप्ते भरण्यासाठी झालेल्या मानसिक त्रासातून मुळेगाव रस्त्यावरील मोमीन नगर येथील मो . रफीक म . रहमान उस्ताद ( वय ३० ) या टॉवेल कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली . मो . रफीक हे टॉवेल कारखान्यातील लूमवर काम करीत होते . लॉकडाउनमध्ये कारखाने बंद होते . यामुळे त्यांच्या हाताला काम नव्हते .

 त्यातच त्यांनी बचत गटातून कर्ज घेतले होते. अनेकवेळा त्यांनी उसने पैसे घेऊन हप्ता भरला. परंतु , प्रत्येकवेळी ते शक्य नव्हते . यामुळे ते मानसिक तणावाखाली होते . यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. मो. रफीक यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. याबाबत प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे .
 

Post a Comment

0 Comments