"प्राध्यापक पेशा हा वैचारिक प्रगल्भता,आर्थिक सुबत्ता, सामाजिक बांधिलकी, प्रतिष्ठा व देशाचा सच्चा नागरिक निर्माण करण्याची क्षमता प्रदान करणारा - प्रा.इम्रान मणेर"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने एम.ए. अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनच्या अनुषंगाने'सेट नेट मार्गदर्शन कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले होते. यावेळी मथुबाई गरवारे कॉलेजचे प्रा. इम्रान मणेर हे प्रमुख पाहुणे व साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते.
       
 एम. ए. भाग- २ ची विद्यार्थिनी यास्मिन मुल्ला हिने या कार्यक्रमातील उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत करून या कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या की, आपल्याकडे करिअर म्हणून फक्त स्पर्धा परीक्षेबाबत सांगितले जाते मात्र  प्राध्यापक होण्यासाठी सेट- नेट  परीक्षा पात्र होणे गरजेचे असते  याबाबत  जबाबदारीने व गंभीरपणे कोणीही  सांगत नाही. त्यामुळे प्राध्यापक  होण्यासाठी  सेट- नेट परीक्षा किती महत्त्वाची व आवश्यक असून   त्याची संपूर्ण माहिती व ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू होता हे त्यांनी अगदी स्पष्ट केले.    
   

 स्वप्नाली अकिवाटे या  विद्यार्थिनीने प्रा. मणेर यांचा उत्तम परिचय करून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्यांनी उपस्थितांच्या मध्ये निर्माण केली.   
  
त्यानंतर प्रा. इम्रान मणेर  हे सेट- नेट कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भाष्य करतात की, कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना एम. ए. पदवी संपादन केल्यानंतर यूजीसीच्या नियमानुसार नंतर सेट-नेट परीक्षेस बसण्यास पात्र  होता येते. तसेच ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना  सहाय्यक प्राध्यापक म्हणून  कायमस्वरूपी नोकरी मिळवित येते. यासाठी या परीक्षेची तयारी ही बी.ए. पासूनच करावी लागते यासाठी ध्येय निश्चित करणे व संपादन करण्यासाठीची मानसिकता सबल बनविण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते.त्या नंतर मात्र एम.ए.मध्ये असताना या परीक्षेसाठी जय्यत तयारी म्हणून मागील प्रश्नपत्रिका अभ्यासणे ,प्रश्नांनाचे स्वरूप समजून घेणे, कोणत्या घटकावर किती व कसे प्रश्न विचारले गेले आहेत हे समजून घ्यावे, त्यामुळे या परीक्षेची  काठीण्य पातळी  समजून घेण्यास सोपे जाते. एकदा या सर्व गोष्टींची समज आली की संपूर्ण अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून वेळापत्रकाचे नियोजन करावे कारण या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित असल्यामुळे आपणास नियोजन करणे सोपे जाते. योग्य नियोजन व विषयांची विभागणी करून  त्या दिशेने अभ्यासास सुरवात करणे  गरजेचे आहे. 
   

या नंतर प्रा.मणेर यांनी  परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली,संदर्भ पुस्तके कोणती वापरावीत याची यादी दिली. नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले, अलिकडील विचारले जाणारे प्रश्न कसे आहेत व दोन विषयांचा एकमेकांशी संबध लावून कसे प्रश्न विचारले जातात यावर त्यांनी सखोल  मार्गदर्शन केले.
     
  यानंतर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने यांनी याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना या परीक्षेत सुयश मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेचे अध्यक्ष व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.के.डी.खळदकर यांनी अध्यक्षीय मनोगतात भाष्य करताना म्हणाले की, ही परीक्षा अत्यंत सोपी असून नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड दिली तर या परीक्षेत यश निश्चितपणे प्राप्त होते. यासाठी त्यांनी वास्तववादी उदाहरणे दिली. 
    

 या कार्यक्रमाचे आभार उत्तम पद्धतीने एम.ए.ची विद्यार्थिनी स्मिता कांबळे हिने मानले तसेच या कार्यक्रमाचे प्रभावपूर्ण व  नियोजनबद्ध सूत्रसंचालन कु.स्नेहल खिलारे हिने केले. या कार्यक्रमास प्रा.सौ.स्वाती माळकर,प्रा.मेहबूब मुजावर,प्रा.डॉ. पी पवार,प्रा.सौ.टारे,विनीत रांजणे, जीवन आवळे,गणेश कुरले व एम.ए.भाग- १ व २ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेबाबत विद्यार्थी समाधान असून या कार्यशाळेतील सखोल व प्रभावी मार्गदर्शनामुळे भविष्यात या अभ्यासाची योग्य दिशा काय असावी व परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विश्वास यामुळे निर्माण झाला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातून येत आहे.

Post a Comment

0 Comments