बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल


मुंबई/प्रतिनिधी: 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी ‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाच्या लेखकाने कंगनावर कॉपीराईट उल्लंघनाची तक्रार दाखल केली होती. यावर कोर्टाच्या आदेशानंतर आता मुंबई पोलिसांनी शुक्रवारी  अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरूद्ध कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्री कंगनाशिवाय कमल कुमार जैन, रंगोली चंदेल आणि अक्षत रनौत यांच्याविरूद्धही खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला होता. या पुस्तकाची हिंदी अनुवादित आवृत्ती ‘दिद्दा काश्मीरकी योद्धा रानी’ या नावाने प्रकाशित झाली आहे.

Post a Comment

0 Comments