मंगळवेढा तालुक्यातील ग्रामसेवकाला जीवे मारण्याची धमकी, एकावर गुन्हा दाखल


मंगळवेढा/प्रतिनिधी:

मंगळवेढा तालुक्यामध्ये मारापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मधुकर गुलाब पवार यांना 'घर कामासाठी वाळूचा परवाना दे, अन्यथा तुझा खेळ खल्लास' जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. शेलार नेताजी पाटील (रा. यादव वस्ती, मारापुर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत कार्यालयसमोर येऊन ग्रामसेवकाला धमकी..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मारापुर ग्रामपंचायत ग्रामसेवक मधुकर गुलाबराव पवार हे ग्रामपंचायत कार्यालय बाहेर थांबले होते. त्यावेळी शेलार पाटील याने तिथे येऊन 'माझ्या घर बांधण्यासठी वाळू पाहिजे, त्यासाठी परवाना दे व माझ्या घरकुलाचे बिल मंजूर करून दे' अन्यथा 'तुझा खेळ खल्लास, तुला बघून घेतो' तसेच तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे म्हणत पवार यांच्या हातातील सरकारी कामकाजाची पिशवी हिसकावून घेवून जमिनीवर फेकून दिले.

मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ग्रामसेवक मधुकर पवार यांनी शेलार पाटील यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी देणे, सरकारी कामात अडथळा आणणे फिर्याद मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. या प्रकरणी आरोपीविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ३५३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments