माजी जि.प. सदस्या मंदाकिनी धनाजीराव साठे यांचे निधन


माढा/प्रतिनिधी: 

माजी आमदार ॲड. धनाजीराव साठे यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी धनाजीराव साठे (वय ७)  अल्पशा आजाराने निधन झाले. सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकारमहर्षी गणपतराव साठे यांच्या स्नूषा तर काँग्रेसचे युवक नेते दादासाहेब साठे यांच्या त्या मातोश्री होत.

माजी आमदार धनाजीराव साठे यांचे सर्व सुखदुःखाच्या , यश अपयशाच्या काळात सौ साठेकाकी यांनी त्यांना मोलाची साथ दिली होती. काकी यांनी सन २००२ ते २००७ या काळात माढा जिल्हा परिषदेचे सदस्यत्व भूषविले होते. यावेळी त्यांनी माढा व परिसरासाठी भरीव कार्य केले होते.

आज सायंकाळी पाच वाजता माढ्यातील मंगळवार पेठेतील साठे मळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments