२१ मार्च! आज दिवस व रात्र १२ तासाचे



 आजचा (२१ मार्च) दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे

सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते.

जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पृथ्वीवरील विविध ऋतू सूर्याच्या हालचालींवर आधारित असतात. यानुसार, वर्षातील दोन दिवस सूर्योदय व सूर्यास्त यामध्ये बरोबर १२ तासांचे अंतर असते.

तर अन्य दोन दिवशी हे अंतर १३ आणि ११ तासांचे होते. यापैकी जून महिन्यात दिवस मोठा व रात्र लहान तर डिसेंबर महिन्यात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. मात्र उन्हाळ्याच्या आधी आणि हिवाळ्याच्या आधी अर्थात मार्च आणि सप्टेंबर महिन्यात दिवस-रात्र १२-१२ तासांचे असतात.

Post a Comment

0 Comments