‘या’ प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड अडचणीत


 कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  यांच्या  अडचणी वाढल्या आहेत. कारण सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्धच्या त्यांच्या मोबाईल फोनचा संपर्क तपशील नोंद काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अंबानी स्फोटक प्रकरण आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे अगोदरच घायाकुतीला आलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत ‘या’ प्रकरणामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

यायाबाबत अधिक माहिती अशी कि, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्यावेळी मंत्री आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलीस शिपायांनी नेले होते. या प्रकरणी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती.

Post a Comment

0 Comments