वन दिन विशेष : कोल्हापुरात देसाई व सनगर या दोन जेष्ठांनी जगवला वृक्षांचा मळा !


कोल्हापूर / शंकर सनगर:

संयुक्त राष्ट्र संघाने २१ मार्च २०१२ रोजी  आंतरराष्ट्रीय वन दिनाची स्थापना केली.२८ नोव्हेंबर २०१२ रोजी चालू व भविष्यातील आगामी  पिढ्यांच्या हितार्थ निसर्ग संतुलन अबाधित राखण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.जंगलाबाहेर वृक्षारोपण करणेसाठी जागरुकता आणण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. 

कोल्हापूर शहर परिसरात सातत्याने स्वयंस्फुर्तीने वृक्षरोपन व त्यांचे संवर्धन करणारे दोन अवलीयांच्या दैनंदिन उपक्रमा करत आहेत.कृषी विद्यापीठ राहुरी येथील ६६ वर्षीय सेवानिवृत्त ए.टी.देसाई व निवृत्त वायुसेनानी शं.रा.सनगर हे वेगळा उपक्रम राबत आहेत.यंदा पावसाळ्यात कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विनावापर परंतू राखीव, घनदाट काटेरी झुडूपे व तनकट-गवताच्छादित क्षेत्रातील जागेत आंबा, केळी, पेरु,लिंबू अशी फळ झाडे लावली आहेत.तसेच लाजरी, कांडवळ, गुळवेल, ईन्सुलिन, पर्णफुटी, कडीपत्ता, बिल्वपत्र ई. औषधी वनस्पती, विविध फुलझाडे तसेच पिंपळाच्या रोपांचाही यात समावेश आहे.एकूण ५१ रोपे लावून त्याचे यशस्वीपणे संवर्धन ते करत आहेत. 

पावसाळा संपल्यानंतर ही वृक्ष संपदा जगवण्यासाठी परिसरातील दुरवर असणार्या डबके नाल्यातुन बाटलीने पाण्याची पूर्तता केली गेली. तसेच तेही स्त्रोत संपल्यानंतर २ कि.मी. अंतरावरील अगदी घरातून  स्कुटर वरुन पाणी नेत त्यांनी वृक्ष जगवली.

जवळ-जवळ १०० मीटर अंतरावरील खाचखळगे असलेल्या मार्गावरील थेंब-थेंब स्वरुपात पाझरणार्या मार्गावर छोटासा बंधारा घालुन त्यात साठलेल्या पाण्याचा झाडे जगवण्यासाठी कष्टाने ते सिंचन करतात. पुर्वीपासून वाढलेल्या पळस या वृक्षांची नियमीत छाटणी करुन संगोपन ते करत आहेत.

वृक्षजीव संवर्धना बरोबरच तेथील काटेरी व गवाताळ झुडूपे तोडून आगामी पावसाळ्यात कुजून खताप्रमाणे उपयोग करुन घेणेसाठी खोल अशा डबर्यात मोठ्या प्रमाणात साठण केली आहे. या साठी लागणारे सर्व श्रम हे दोघेच घेत असलेचे चित्र आहे. या  कृषी महाविद्यालय परिसरात फिरावयास येणाऱ्या वृध्द-तरुण नागरिकांचे लक्ष वेधावे म्हणून  येथील बहुतांश जागेतील पाला पाचोळा एकत्र करुन परीसर नेहमी स्वच्छ ठेवत आहेत. ज्यामुळे श्रमदानासाठी ईच्छुक नागरिकांची संख्या वाढेल तसेच इतरांना देखील वनसंपदेच्या संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी असे त्यांचे प्रयत्न आहेत.
            
अलिकडेच या परिसरातील फिरण्यास येणाऱ्या अन्य  मोजक्याच नागरीकांनी यांच्या श्रमाची दखल घेऊन सहाय्य करत आहेत. त्यात श्री.निकम, विद्यालयीन शिक्षक माने, सेवानिवृत्त वाघुर्डेकर - पाटील यांचा सहभाग आहे.आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नविन वृक्षारोपण करण्याचे त्यांचे ध्येय आहे.श्री.देसाई व सनगर यांनी या संवर्धित वृक्षसंपदेच्या संरक्षणार्थ राबण्यात येत असलेला उपक्रम पर्यावरणीय काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

Post a Comment

2 Comments

  1. प्रेरणादायी, बदलत्या नैसर्गिक ऋतुमानामुळे ढळत चाललेला पर्यावरण समतोल राखणेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जागृती आणने आनिवार्य आहे.

    ReplyDelete