"जयसिंगपूरचे सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अभिजीत पलसे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न"

प्रा.डॉ. प्रभाकर माने / शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

जयसिंगपूर शहरातील छ.संभाजी नगर तरुण मंडळाचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक अभिजीत पलसे यांचा वाढदिवस समाजातील वंचित घटकांना लाभदायक ठरणाऱ्या  उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात व आनंदात साजरा झाला.
           
युवा उद्योजक अभिजित पलसे हे मुळात एका अत्यंत गरीब, वंचित घटकातून स्वतःच्या कार्य कर्तुत्वावर व कामावर श्रद्धा ठेवून अल्पावधीतच युवा उद्योजक म्हणून एक उभरते व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. गरीबाची चाड व सामाजिक  जाणिवा  असल्यामुळे अत्यंत तळमळीने बालपणापासूनच सामाजिक बांधिलकीचे व्रत घेऊन आज तागायत त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास सुरू आहे त्यांच्या याच प्रवासातील आठवणीत ठेवण्यासारखा व समाजाला आदर्श व आनंद निर्माण करून देणारे असंख्य उपक्रम ते राबवित असतात.मुळात त्यांचे उपक्रम हे समाजातील गरीब, शोषित व वंचित घटकांसाठी असतात.
       
युवा उद्योजक अभिजीत पलसे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेहमीप्रमाणे आई वृद्धाश्रमास, आश्रम शाळेस व  श्रावणबाळ विकलांग संस्था,नांदणीस भेट देऊन त्यांना फळे वाटप व अन्य स्वरूपातील मदत दिली. तसेच झोपडपट्टीमध्ये मास्क व सनिटायजरचे वाटप करून सर्वांना कोरोना मुक्त राहण्याबाबतचा संदेशही त्यांनी अत्यंत तळमळीने दिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छ. संभाजीनगर या वंचित असणाऱ्या झोपडपट्टीत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्याचबरोबर लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी संगीत खुर्चीचे व लहान मुलींसाठी दोरी उडीचे  आयोजन करण्यात आले होते. इतक्या विविधांगी उपक्रमाने त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे हे मात्र सत्य आह. तसेच या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना संजय पाटील- यड्रावकर व संभाजी मोरे साहेब  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पैठणी साडी देण्यात आली. तसेच दिव्यांग भगिनी शितल विश्वनाथ कोरवी यांची ठाणे येथे झालेल्या स्पर्धेतील  उत्कृष्ट चमकदार कामगिरी करून जयसिंगपूर शहराचा नावाचा गौरव झाल्याबद्दल व  सपना लक्ष्मण तेरदाळे या  भगिनीने  केलेल्या कामाचे  यथोचित सत्कार यानिमित्ताने करण्यात आला. तसेच कोरोना काळात अत्यंत तळमळीने व  जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या घटकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
        
 छ. संभाजीनगर तरुण मंडळाच्या वतीने युवा उद्योजक अभिजित पलसे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करीत असताना जयसिंगपूर नगरीचे कार्यशील उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर व ज्येष्ठ ,अत्यंत तळमळीने काम करणारे नगरसेवक संभाजी मोरे, अत्यंत तरुण नगरसेवक व वंचित घटकांचे नेते गुंडाप्पा पवार यांच्या उपस्थितीत या वाढदिवसाचा जल्लोष पूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संजय पाटील- यड्रावकर यांनी केक भरवून अभिजीत पलसे यांना वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन दिले. त्याच वेळी इतर मान्यवरांनीही वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या.
      हा अत्यंत उत्साहपूर्ण व वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा कार्यक्रम पाहून उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर भावुक झाले होते. त्यांनी या मंडळासाठी भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व त्याच वेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड यांच्या माध्यमातून होणाऱ्या समाजोपयोगी कामाची चर्चा केली.
        
या कार्यक्रमास युवा उद्योजक  परशुराम धनवडे,सामाजिक कार्यकर्ते अरुण लाटवडे, रामदास धनवडे, बबलू नलवडे,विजित पाचोरे, अजित उर्फ बंडू पवार, संतोष उर्फ बंडू रजपूत, अब्दुल बागवान,पिंटू वडर, चंद्रकांत भंडारे, युवा नेते विकास देवाळे, राहिल मणेर,रतन हडपद, लखन हतळगे,प्रताप रजपुत, नितीन देसाई,सुकुमार काळे, आकाश धनवडे, गिरीश तेरदाळे, विनायक गायकवाड व अमोल सरवदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र पणे कष्ट घेतले. तसेच छ. संभाजी राजे तरूण मंडळ,अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, जयसिंगनगर तरुण मंडळ, रणवीर चौक जयसिंगपूर,साई गणेश उत्सव मंडळ, श्री समर्थ मंडप डेकोरेशन व समस्त संभाजी नगर मधील सर्व माता बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
        या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेतलेल्या रांगोळी स्पर्धसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध चित्रकार राहुल शेडबाळे, रांगोळी आर्टिस्ट पृथ्वीराज शिंदे, प्रमोद शर्मा,नेहा राठोर व रासुरे त्यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले. या युवा उद्योजक  अभिजीत पलसे यांच्या अभूतपूर्व वाढदिवस सोहळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments