बार्शी! शेंद्रीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा अनोखा संकल्प उपक्रम ; गावकरी देतायत मोलाची साथ


बार्शी/प्रतिनिधी:

" बदलाची सुरुवात स्वतः पासून " या पंक्तीस अनुसरून रविवार दि १४ मार्च २०२१ रोजी शेंद्री स्टेशन ते शेंद्री गाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा अनोखा संकल्प हाती घेण्यात आला. खरे पाहता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो, तरीही गावाची अत्यंत महत्वाची गरज ओळखून हा संकल्प कर्तव्याची सीमा न पाहता हाती घेण्यात आला.
         
 स्वतः सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील लहान थोर मंडळींनी, तसेच वयोवृद्ध नागरिकांनी सुध्दा यामध्ये स्वयं उत्स्फूर्तसहभाग घेतला. कोणी श्रमदान करणाऱ्यांना नाश्ता दिला, कोणी पाणी दिले, कोणी थेट हातामध्ये खोऱ्या पाट्या घेऊन सहभाग नोंदवला. कोणत्याही प्रसिद्धीचा उद्देश समोर न ठेवता हा उपक्रम राबविण्यात आला.
         
असेच अनेक संकल्प आम्ही आपल्या सेवेत घेऊन येत आहोत."नव्या नौरीचे नऊ दिवस" असा प्रकार न होता, हा लोकसेवेचा व्रत अखंड ५ वर्ष जपला जाणार आहे, तेव्हा मित्रांनो आम्हा सर्व लोकप्रतनिधींच्या नसा - नसात विकास भिनलाय, आपल्याही तो भिनला पाहिजे !! बदल घडतोय बदलाचे साक्षीदार तुम्ही ही व्हा !! या, सामील व्हा. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक उपक्रमास साथ द्या.

Post a Comment

0 Comments