अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २५ जण कोरोना पॉझिटिव्ह राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस आणि पत्रकारांचा समावेश आहे. यात एकाही आमदाराला कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगण्यात आलं.
(Advertise)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३२०० जणांची कोव्हिड-१९ ची टेस्ट करण्यात आली होती. यात २५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये २३ पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये विधीमंडळ, मंत्रालय, पोलीस सुरक्षा आदींचा समावेश आहे. बहुतेक आमदारांनी खासगी टेस्ट केल्याने त्यांचा डाटा उपलब्ध नसल्याची माहिती आहे.

 गेल्या दोन दिवसांपासून ही कोरोना चाचणी करण्यात येत होती. काही आमदारांचीही चाचणी झाली होती. मात्र या आमदारांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

Post a Comment

0 Comments