भारत आणि इंग्लंड संघांमधील उर्वरित तिन्ही टी २० सामने आता प्रेक्षकांविना


दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील उर्वरित तिनही सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहेत.

भारत आणि इंग्लंड संघांमधली पाच टी २० सामन्यांची मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. त्यापैकी १६, १८ आणि २० मार्च रोजी नियोजित टी २० सामने आता प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहेत.

 जीसीए उपाध्यक्ष धनराज नथवानी म्हणाले, १६, १८ आणि २०  मार्चला होणाऱ्या मॅचसाठी ज्यांनी तिकिट खरेदी केले आहेत त्याचे पैसे परत करण्यात येतीस. अहमदाबाद येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

टी २०  पहिल्या दोन सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवप वनडे सीरीज देखील रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments