महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावई आणि मुलीची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त केल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. तर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये राजकीय सूडापोटी ईडीला हाताशी धरुन त्रास दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणात येस बँकेचे राणा कपूर यांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे.
यात येस बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची २ हजार ४०० कोटी रुपयांची प्रोपर्टी अटॅच आहे. यात राणा कपूर यांची १ हजार कोटी आणि वाधवान बंधुंची १ हजार ४०० कोटी रुपयांची प्रॉपर्टी सामिल आहे. ही संपत्ती अधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथील आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने डीएचएफएल प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलकडे (NCLT) सोपवलं होतं. डीएचएफएल अशी पहिली वित्तीय कंपनी आहे, जी RBI ने कलम २२७ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत NCLT मध्ये पाठवलं होतं. यापूर्वी कंपनी बोर्डाला बरखास्त करण्यात आलं होतं.
0 Comments