चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींकडून वसुली करण्याची योजना - अमृता फडणवीस


अमृता फडणवीस ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विरोधी पक्षाने सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. त्यातच, चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आखत आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

अमृता यांनी बुधवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत, असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments