९५ हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवणार्‍या आरोपीला बार्शी तालुका पोलीस स्टेशन केली अटक


बार्शी/प्रतिनिधी:

धनंजय शिवाजी चव्हाण यांनी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २७-०-२०२१ रोजी सायंकाळी सात वाजता सुमारास लक्ष्याचे वाडी शिवारात धनंजय चव्हाण यांच्या शेतात उपळाई रोड कॅनल च्या जवळ मौजे लक्षाची वाडी तालुका बार्शी येथून त्यांच्या शेतातून धनंजय चव्हाण व त्यांच्या पत्नी जयश्री परत येण्यासाठी निघाले असता तीन अनोळखी इसम अचानक फिर्यादी व त्यांच्या पत्नी च्या जवळ आले.

 त्यांनी धनंजय चव्हाण यांना धक्काबुक्की करून त्यांच्या जवळ असलेली रोख रक्कम तसेच फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच मोबाईल असा एकूण ९५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन पळून जाणाऱ्या आरोपीविरुद्ध बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला होता त्यातील एका आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन प्रभारी शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments