कवठेमहांकाळ तालुका हादरला, पिंपळवाडीच्या माजी संरपंचाच्या भाच्याला अज्ञात हल्लेखोरांनी भोकसले


कवठेमहांकाळ :

बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्याचा खून होऊन दोन दिवस सुध्दा उलटले नाहीत, तोपर्यंत  तालुक्यात अजून एक खुनी हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर (वय २५) याला दोन अज्ञात हल्लेखोरांनी भोकसले आहे.       

ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात घडली. हल्ल्यात अमर आटपाडकरचा मित्र विजय माने हा सुध्दा जखमी झाला आहे.

अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार करुन अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत. अमर आटपाडकर याची परिस्थिती गंभीर आणि नाजूक आहे असे समजते. अमर आटपाडकर यांच्यावर कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्‍यानंतर पुढील उपचारासाठी मिरजेला हलविण्यात आले आहे.

दरम्यान पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत हे हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील एक प्रमुख संशयित आरोपी आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या दिशेने तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे. 




Post a Comment

0 Comments