"राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कोविड-१९ लसीकरण जनजागृती कार्यशाळा संपन्न "


रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 'कोविड-१९ लसीकरण जनजागृती कार्यशाळा' संपन्न झाली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेच्या श्री. विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय पेठवडगाव क्लस्टर अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
     
सदर कार्यशाळेत रुकडी येथील साईनाथ हॉस्पिटलचे डॉ. प्रसन्न पवार , प्राथमिक आरोग्य पथक रुकडीचे आरोग्य अधिकारी डॉ.खलील तांबोळी यांनी करोना  व लसीकरणा बाबत माहिती दिली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे यांनी केले. डॉ. प्रसन्न पवार यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून करोनाची सुरुवात, प्रसार , लक्षणे करोना होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी, करोना विषयीचा भविष्यकाळ याचे सविस्तर विवेचन केले. 
          
डॉ. खलील तांबोळी आपल्या भाषणात म्हणाले कोरोना पासून सुरक्षित राहायचे असेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. कामाव्यतिरिक्त्त घरातून बाहेर पडू नये, बाहेर जातेवेळी मास्क हा वापरलाच पाहिजे पण अनेक जण मास्क शिवाय फिरताना दिसतात, नियमितपणे सॕनिटायझरचा वापर केला पाहिजे, साबणाने किंवा हँडवॉशने नियमितपणे हात धुतले पाहिजेत, सामाजिक अंतर राखून सर्व व्यवहार केले तर आपल्यासह समाजाचे कोरोना पासून संरक्षण होईल.डॉ.तांबोळी यांनी कोरोना लसी बाबत शास्त्रीय माहिती दिली. 
       
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे म्हणाले भारताने कोरोना विरोधात लस तयार केली आहे, जगातील काही देशांना भारत ही लस पुरवित आहे,त्या देशात या लसीचे कौतुक केले जात आहे मात्र भारतातील लोक लसीकरणासाठी योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ही लस  कोरोना विरोधात शरीरात योग्य प्रतिकारक शक्त्ती निर्माण करते. साठ वर्षापुढील नागरिक व पंचेचाळीस वर्षापुढील व्याधिग्रस्त नागरिकांनी ही लस घेण्याबाबत समाजात जनजागृती करावी.
  
  या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. शंकर दळवी यांनी मानले तर सुंदर  सूत्रसंचालन डॉ.माधवी सोळांकूरकर यांनी केले.  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी स्वयंसेवकांकडून समाधान व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments