ओबीसी आरक्षणप्रश्नी मुंबईत भाजपचा आक्रोश मोर्चाओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज सकाळी भाजपकडून आक्रोश आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी हे ओबीसी आरक्षणाचे राजकारण करत असल्याची टीका आंदोलकांनी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

यावेळी भाजपच्या कार्यालयासमोर शेकडो ओबीसी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. तसेच,कार्यकर्त्यांनी हे आंदोलन भाजपचे कार्यालय ते विधान भवानापर्यंत घेऊन जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांचा मोर्चा मध्येच अडवून कार्यकर्त्यांना अटक केली.

 या मोर्चाचे नेतृत्व  नेतृत्व महाराष्ट्र ओबीसी प्रभारी संजय कुटे आणि तसेच ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले. 

Post a Comment

0 Comments