घरगुती वापराच्या गॅसच्या किमती २५ रुपयांनी वाढवल्या, यावर्षी २ महिन्यात १२५ रुपयांनी महागले गॅस


पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशाला आता गॅसने सुद्धा कात्री लावली. सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून गॅसच्या किमतींमध्ये २५ रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीत आता सबसिडी नसलेला LPG सिलेंडर८१९  रुपयांत मिळत आहे. आधी याची किंमत ७९४ रुपये एवढी होती. २०२१ मध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांतच घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये तब्बल १२५ रुपयांची वाढ झाली आहे. १ जानेवारी रोजी जे सिलेंडर ६९४ रुपयांना मिळत होते ते आता ८१९ रुपयांवर पोहोचले आहे.

फेब्रुवारीत तीनदा महागले

फेब्रुवारी महिन्यात घरातील एलपीजी सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने ४ फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये २५ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी त्यात ५० रुपयांची आणि २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा २५ रुपयांची वाढ केली. अर्थात एका महिन्यातच सिलेंडरचे भाव १०० रुपयांनी वाढवण्यात आले.
(Advertis)

डिसेंबरपासून आतापर्यंत २२५ रुपयांनी महागले
१ डिसेंबर २०२० रोजी गॅस सिलेंडरची किंमत ५९४ रुपयांवरून ६४४ करण्यात आली. १ जानेवारी रोजी त्यात पुन्हा ५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे एक घरगुती स्वयंपाकाचे सिलेंडर ६९४ रुपयांत येत होते. मग फेब्रुवारी महिन्यात तीनदा एकूणच १०० रुपये वाढवण्यात आले. अशा प्रकारे २५ फेब्रुवारी रोजीच गॅस सिलेंडरची किंमत  ७९४ रुपये झाली. आता १ मार्चपासून आणखी २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून घरगुती LPG च्या वर्षातून १२ टाक्यांवर सबसिडी अर्थात सवलत दिली जाते.

कमर्शिअल सिलेंडरच्या किमती सुद्धा वाढल्या
१९ किलोच्या कमर्शिअल सिलेंडरच्या किमती सुद्धा  ९०.५० रुपयांनी महागल्या आहेत. दिल्लीत आता कमर्शिअल सिलेंडरची किंमत  १६१४ रुपये तर मुंबईत १५६३.५० रुपये करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments