.... अजित पवारांच्या गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित


अजित पवार यांच्या काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित झाला आहे. विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरुन महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

महेश मोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर विहिरीची नोंद करण्यासाठी त्यांनी २० हजारांची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये संबंधित तलाठ्याला देत असतानाच्या प्रसंगाचा व्हीडीओ शेतकरी धायगुडे यांनी काढून घेतला. या व्हीडीओमध्ये तलाठी पैसे मोजताना दिसत आहेत. तसेच मला वरही पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे, मी करून घेतो, अशी चर्चा त्यात एकू येत आहे. हा व्हीडीअो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तलाठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments