माजी मंत्री दिलीप सोपल यांची बार्शीत शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना सदिच्छा भेटबार्शी/प्रतिनिधी:

 शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आज दुपारी बार्शी पोलीस ठाणेला भेट दिली. यावेळी, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.

सोपल यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. सोपल यांनी नेमकं कशामुळे पोलीस ठाण्याला भेट दिली, याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, यावेळी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे हेही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments