बार्शी! पाथरीत बाप लेकाला तलवारीने व लोखंडी गजाने मारून जबर जखमी रस्त्यावर टाकले; मुरूम टाकल्याने बाप लेकाला मारहाण


 बार्शी/प्रतिनिधी:

रस्त्यावर मुरुम का टाकला या कारणावरून पाथरीत बाप लेकाला तलवारीने व लोखंडी गजाने मारून जखमी करण्यात आले. या मारहाणीत गंभीर जमखी झालेल्या दोघांवरही बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बार्शी तालुक्यातील पाथरी येथे ही घटना घडली असून याप्रकरणी नऊजणांविरुध्द तालुका पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Advertise)

मारहाणप्रकरणी विजयकुमार रामलिंग गायकवाड (वय ४२, रा. पाथरी, ता.बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान या मारहाणीत फिर्यादी गायकवाड व  वडिल रामलिंग गायकवाड हे  जखमी झाले आहेत. या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी फिर्यादी उभे १ पाथरी होते. यामध्ये त्यांचा पराभव झाला व विरोधात उभे असलेले नंदू सोनवणे हे विजयी झाले.

त्यावेळी नंदू सोनवणे, पाडूरंग “खरात व दत्ता खरात यांच्यात व फिर्यादीमध्ये निवडणुकीच्या कारणावरून बाचाबाची झाली होती. यानंतर २७ फेब्रुवारी २०२१ रोजी लहान भावाच्या घराचे बांधकाम चालू असल्याने बांधकामाचा पाया भरण्यासाठी फिर्यादीने विहीरीतील मुरुम ट्रॅक्टरने घरासमोर आणून टाकला. त्याचदिवशी रात्री पावणे बारा वाजता घराची कडी वाजली म्हणून भाऊ, वडील व फिर्यादी यांना दरवाजा उघडला, तेव्हा दयानंद पाटील, नंदू सोनवणे, पाडूरंग खरात व दत्ता खरात उभा होते. यावेळी दयानंद पाटील हे रस्त्यावर मुरुम का टाकला असे आम्हाला विचारु लागले. पाटील हे विचारत असतानाच सोनवणे व इतर दोघांनी आम्हाला घराबाहेर ओढले व मारहाण सुरु केली.

(Advertise)

 पाडूरंग खरात याने फिर्यादीचे वडिल रामलिंग गायकवाड यांच्या डोक्यात तलवार मारल्याने ते जखमी झाले, तर सोनवणे याने लोखंडी गजाने फिर्यादीला मारले. यानंतर भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादीचा मोठा भाऊ संजय गायकवाड मध्ये आला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. मारहाण करणारे सर्व मद्य प्राशन केलेले होते. या मारहाणीत जखमी झालेले फिर्यादी व त्यांचे वडिल जखमी झाल्याने त्यांना बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनंतर दयानंद पाटील, नंदू सोनवणे, पाडूरंग खरात, दत्ता
खरात, काका सोमनाथ सोनवणे, हरी जावळे,
कल्पना खरात, सीमा सोनवणे, बबीता खरात (सर्व रा. पाथरी, ता.बार्शी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस उपनिरीक्षक युवराज सूर्यवंशी करीत आहेत.
 

Post a Comment

0 Comments