"राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जयसिंगपूर कॉलेजमध्ये प्लॅस्टिक मुक्त परिसराची मोहिम राबविली"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अनेक महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात त्यापैकीच संत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियानांतर्गत प्लास्टिक मुक्त परिसर हा उपक्रम दोन टप्प्यात राबविण्यात आला.
      

 सुरुवातीस या अभियानांतर्गत मा.प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी या उपक्रमास मार्गदर्शन करून शुभेच्छा  दिल्या व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.प्रभाकर माने यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजनेचे सात गट पाडून प्रत्येक गटात पाच विद्यार्थी स्वयंसेवक अशी गटाची व्यवस्था करण्यात आली होती. या गटाकडून दिलेल्या परिसरातील विशेष ठिकाणी म्हणजेच 400 मीटर रनिंग ट्रॅक स्विमिंग टॅंक परिसर बॅडमिंटन ग्राउंड परिसर वाहन पार्किंग परिसर व कॉलेजचा मुख्य रस्ता या  ठिकाणी असणाऱ्या विविध स्वरुपातील प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या, खाऊचे रॅपर्स, मास्क, अन्य काही प्लास्टिक यांचे संकलन करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांनी जवळपास तीन तासांमध्ये एकूण १३ सिमेंटच्या पिशवीमध्ये हे प्लॅस्टिक भरण्यात आले होते. सदर प्लॅस्टिक संकलनाबरोबर विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्त परिसर करण्यासंदर्भात च्या घोषणा देऊन जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला. सदर कार्य सुरू असताना कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा. अण्णासाहेब क्वाणे यांनी हे काम पाहून या विद्यार्थ्यांच्या कार्याचे मनस्वी कौतुक केले.
      
मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थिनी यांचे पाच गट पाडून त्यांनी कॉलेजमधील फुटबॉल मैदान, कॉलेज कॅन्टीन,कॉलेजच्या मुख्य कॅम्पस व वाचन कट्टा परिसर प्लास्टिक मुक्त करून सुशोभित केला. या परिसरामध्ये साधारणपणे सिमेंटची १२ पोती इतका  प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. हे कार्य करीत असताना उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनींनी  प्लास्टिक मुक्त परिसर व स्वच्छता यासंदर्भात घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला.
     

यानंतर एकूण सिमेंटची २५ पोती भरून संकलित झालेला कचरा जयसिंगपूर नगरपरिषदेच्या घंटागाडी मध्ये  भरून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
    
 यासाठी जयसिंगपूर नगरपरिषद व कर्मचारी नितीन दाभाडे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष  डॉ. सुभाष अडदंडे,सदस्य जिनेन्द्र दत्तवाडे मामा,उपप्राचार्य सुरत मांजरे, प्रा. मेहबूब मुजावर,जीवन आवळे,गणेश कुरळे, विक्रांत माळी, मंथन महिंद, शुभांगी ठोंबरे, भाग्यश्री लिगाडे व इतर सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे  प्रचंड प्रमाणात सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments